Let the darkness of ignorance be dispelled

Department of Marathi

About Department

 

Test

मराठी विभागामध्ये आपले स्वागत आहे

मराठी विभागाबद्दल (इतिहास, सामर्थ्य आणि उपलब्धी):

मराठी विभागाची स्थापना  जून १९९८ मध्ये झाली. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास आणि वाढ करणे आणि त्यांना मराठी भाषेचे प्रविण आणि सुव्यवस्थित पदवीधर बनवणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे. आमच्या विभागाचा ठाम विश्वास आहे की मराठी भाषा आणि साहित्याचे  ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न त्याच बरोबर आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धात्मक युगात सक्षम बनवणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी,मराठी विभाग अभ्यासक्रमासह वर्षभर अनेक इत्तर उपक्रम आयोजित करतो. विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची विद्यापीठ गुणवत्ता,शैक्षणिक प्रगती उंचावलेली आहे. विभागाचे दोन विद्यार्थी नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, दोन विद्यार्थी  शासकीय सेवेच्या  परीक्षा उत्तीर्ण झाले असून शासकीय सेवेत  कार्यरत आहेत.१५  विद्यार्थी विविध शाळां महाविद्यालयामध्ये मराठीचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .मराठी विभगात संशोधनाभिमुख आणि समर्पित प्राध्यापक सदस्य, सुसज्ज पायाभूत सुविधा (संगणक, इंटरनेट, प्रोजेक्टर, स्क्रीन, ग्रीन बोर्ड .) आणि विविध कार्यक्रम/कोर्सेसची उपलब्धता ही विभागाची ताकद आहे. सध्या, विभागात पदवीपर्यत नियमित शिक्षणाची सोय आहे . २०१९ पासूनमराठी भाषा आणि मराठी व्याकरण’,‘भाषा आणि स्पर्धा परिक्षाव्यक्तीमत्व विकास आणि मराठी भाषायासारखे प्रमाणपत्र अभ्यासक्रम या विभागावतीने पूर्ण केले आहेत.मराठी विभागाने २०१५  मध्ये, ‘पर्यावरणीय ऱ्हासाचे साहित्यातील चित्रणया दोन  दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात सहसंयोजक तर २०२०-२१  या वर्षातमराठी भाषा आणि  सूत्रसंचालनया विषयावरील ऑनलाईन  चर्चासत्राचे आयोजन  केले होते.

२०२१-२२  सुनील कुमार लवटेव्यक्ती आणि साहित्य’  या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र" आयोजित केले होतेमराठी विभागाने  शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ  कोल्हापूर ,अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव, जयसिंगपूर महाविद्यालय जयसिंगपूर , याच्याशी सामंजस्य करार केला  असून विविध कार्यक्रम यामधून झाले आहेत  . मराठी  विभागात दोन स्थायी प्राध्यापक सदस्य आहेत. विद्याशाखा सदस्यांपैकी एक हा सब कमिटी बोर्ड ऑफ स्टडीज (sub commitee) चे  सदस्य आहेत.  SIM संपादकीय इत्यादी सारख्या विविध विद्यापीठ समित्यांचे सदस्य म्हणून काम केले आहे. विद्यार्थ्यांची विद्यापीठ श्रेणीरोजगार क्षम प्रमाण  आणि विद्यार्थ्यांची प्रगती, समाधानकारक आहे .विद्यापीठाच्या समित्यांमध्ये अभ्यासक्रमाची रचना, विद्यापीठ स्तरावर सेल्फ इंस्ट्रक्टेड मटेरियल (सिम) च्या निर्मितीमध्ये प्राध्यापक सदस्यांचा सहभाग  असतों .मराठी विभागाची ठळक आणि  महत्त्वपूर्ण कामगिरी याप्रमाणे आहे .

 

अभ्यासक्रम उद्दिष्टये

सत्र १ (आवश्यक मराठी ) शब्द सहिंता

अभ्यास पत्रिका १

मराठी भाषा आणि साहित्य विषयक अभिरुची विकसित करणे

मराठी साहित्य परंपरा लेखक कवी यांचा परीचय करून देणे

मातृभाषा राष्ट्रीय एकात्मता मानवी मूल्य जाणीव करून देणे

सत्र २ (आवश्यक मराठी )

अभ्यासपत्रिका २

स्पर्धा  परिक्षेची तयारी  व्यक्तिमत्व विकास  घडवणे

निबंध लेखनाच्या माध्यमातून  भाषिक कौशल्ये आत्मसात करणे

सत्र १  ऐच्छिक मराठी

अभ्यास पत्रिका १

मराठी भाषा आणि साहित्य विषयक अभिरुची विकसित करणे

मराठी साहित्य परंपरा लेखक कवी यांच आप्रीचय करून देणे

मातृभाषा राष्ट्रीय एकात्मता मानवी मूल्य जाणीव करून देणे

सत्र २   ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका २

स्पर्धा  परिक्षेची तयारी  व्यक्तिमत्व विकास  घडवणे

चित्रपट आणि प्रसारमाध्यमे यांच्या लेखन आणि उपयोजन आकलनाचा  अवकाश वाढवणे

 

सत्र ३:अभ्यास पत्रिका ३

नाटक वाड्मय प्रकारचे आकलन  झाले

समकालीन नाटकातील समकालाचे प्रतिबिंब

नाट्याभ्यासाद्वारे प्रयोग रूप कला  म्हणून विशेष अभ्यास करता आला

नाट्यांभ्यासातून  सभ्यता संस्कृती राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढीसा लावणे .

संवाद कौशल्ये विकसित करणे

अभ्यास पत्रिका ४

मराठी काव्य परंपरा  व प्रवाहाची ओळख करून घेणे

मराठी काव्यातील माणूस आणि समाज याचा परस्पर सबंध शोधणे

कवितेच्या कलात्मक आकृतीबंधाचे मोल तपासणे

काव्यप्रवाहानुरूप काव्य लेखनाचे विशेष अभ्यासणे

काव्यलेखन कौशल्ये रुजविणे

सत्र ४ :अभ्यास पत्रिका ५

आत्मचरित्र वाड्मय प्रकारची ओळख करून घेणे .

इतर वाड्मय प्रकार आणि आत्मचरित्र यातील आभिवाय्क्ती रूपाचा अभ्यास करणे

वेगवेगळ्या प्रांतातील व परदेशातील जीवनदर्शन समजून घेणे

आत्मवृतपर लेखन  कौशल्ये विकसित करणे .

अभ्यास पत्रिका ६

कादंबरी वाड्मय प्रकारची ओळख करुन घेणे

समकालीन कादंबरीतील नव्या अवकाशाचा शोध घेणे व आधुनिकतेमधीलअंतर्विरोध समजून घेणे

मानवी मुल्य विषयी  जाणीव निर्माण करणे

कादंबरीलेखनाचे विशेष अभ्यासणे

ग्रंथास्वदाची  कौशल्ये रुजवणे

सत्र ५ ; अभ्यास पत्रिका ७

पौर्वात्य व पाश्च्यात्य व आधुनिक भारीय साहित्य्शास्त्राचे स्वरूप समजून घेणे .

ललित व  ललितेतर साहित्याचे स्वरूप समजून घेणे .

साहित्य प्रयोजनाचे आकलन करू न घेणे .

साहित्य निर्मिती  प्र क्रिया   आणि त्याचे स्वरूप समजून घेणे .

भाषेतील अलंकार समजून घेणे

अभ्यासपत्रिका ८

भाषा उत्पत्तीचा अभ्यास करणे

भाषा विज्ञानाचा परिचय घेणे

भाषा विचार आणि मराठी भाषा याचा सह्सबंध जाणून घेणे.

स्वान विचार  रुप्विचार  व वाक्य विचाराचा  परिचय करून घेणे

मराठी भाषेविषयी  विद्यार्थ्यांची आवड  विकसत करणे .

अभ्यास पत्रिका ९

मध्य युगीन वाड्मयाचा कालिक अभ्यास करणे

मध्ययुगीन वाड्मयाचा स्थूल परिचय करून घेणे

मध्ययुगीन वाड्मयाचे स्वरूप  वैशिष्टये  अभ्यासणे

मध्ययुगीन मराठी वाड्मयातील महत्वाचे ग्रंथकार आणि ग्रंथाचा स्थूल परिचय करून घेणे

मध्ययुगीन  मराठी वाड्मयाचच्या गद्य, पद्य रचनेचे विशेष अभ्यासणे

अभ्यास पत्रिका १०

सर्जनशील लेखन प्रक्रिया समजून घेणे

वैचारिक लेखनाचे स्वरूप अभ्यासणे

शोधनिबंध  व प्रकल्प  लेखन कौशल्य समजून घेणे

आंतरजालावरील मराठी लेखन पद्धती अभ्यासणे.

 

अभ्यास पत्रिका ११

मध्ययुगीन  महाराष्ट्र व महानुभाव पंत यांचा परिचय करून घेणे

महानुभाव वाद्मयाच्या प्रेरणा  व स्वरूप समजून घेणे .

महानुभाव ग्रंथकार केसोबास यांचा परिचय करून घेणे

दृष्टांतपाठामधील आशय्स्व्रूप व  अभिव्यक्ती विशेष अभ्यासणे

दृष्टांतपाठातील भाषिक वैभवाचा परिचय करून घेणे .

सत्र ६:अभ्यास पत्रिका १२

शब्द शक्तीचे आकलन करून घेणे

साहित्यातील रसाचे स्वरूप व रस प्रक्रिया समजून घेणे

निर्मितीच्या आनंदाची मीमांसा  करणे

व्यवहारभाषा शास्त्र भाषा आणि साहित्य भाषा यातील भेद समजून घेणे

साहित्य भाषेचे आकलन करून घेणे

भाषेतील छंद व वृत्ते यांचा अभ्यास करणे .

अभ्यास पत्रिका १

मराठी भाषेची  वर्ण व्यवस्था समजून घेणे.

ध्वनी व अर्थ परिवर्तनाची करणे व प्रकार याची माहिती करून घेणे.

प्रमाणभाषेचे स्वरूप व विशेष अभ्यासणे

बोलीचे स्वरूप व  विशेष समजून घेणे

मराठी भाषेबद्दलची आवड विकसित करणे .

अभ्यास पत्रिका १४

मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा कालिक अभ्यास करणे

मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा स्थूल परिचय करून घेणे

पंडित कवी व त्यांची रचना यांचा परिचय  करून घेणे .

बखर वाड्मय आणि शाहिरी वाड्मय यांचे  स्वरूप विशेष अभ्यासणे

मध्ययुगीन मराठी गद्य मराठी पद्य रचनेचे विशेष अभ्यासणे

अभ्यास पत्रिका १५

प्रसार माध्यमातील अर्थार्जनाच्या संधी आणि भाषिक कौशल्ये  यांचा परिचय करून घेणे

स्पर्धा परिक्षा मध्ये मराठी भाषा विषयाचे महत्व समजून घेणे

उद्योग व सेवा क्षेत्रात  मराठी भाषेद्वारे  अर्थाजन प्राप्ती संधर्भात ज्ञान संपादन करणे

मुद्रित शोध्नाची पद्धत  अभ्यासणे

अभ्यास पत्रिका १६

ललित गद्य वाड्मय प्रकारचे स्वरूप  अभ्यासणे

व्यक्तिचित्र संकल्पना व स्वरूप समजून घेणे

प्रवाहानुरूप मराठीतील व्यक्तीचित्रांचे स्वरूप अभ्यासणे

मुलखावेगळी माणसंमधील शैक्षणीक सामाजिक सांस्कृतिक राजकीय पर्यावरण आणि     कौटुंबिक भाव विश्व समजून घेणे .

मुलखावेगळी माणसंमधील  व्यक्तिविशेष आकलन करून घेणे .

मुलखावेगळी माणसंमधील ग्रामीण  व उपेक्षितांच्या जीवनाचे  आकलन करून घेणे .

मुलखावेगळी माणसंमधील  अभिव्यक्ती निवेदनशैली व भाषा विशेष अभ्यासणे.